बिग बॉस मराठी 6 नंतर अनुश्री मानेची तब्येत बिघडली; चाहत्यांना दिली हेल्थ अपडेट

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी 6’ संपल्यानंतर स्पर्धक एकामागोमाग एक मुलाखती आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहेत. मात्र, टॉप 5 मध्ये स्थान मिळवणारी अनुश्री माने कुठेच दिसत नसल्याने तिच्या चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. आता अनुश्रीने स्वतः पुढे येत यामागचं कारण सांगितलं आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तिची तब्येत बिघडली असल्याची माहिती अनुश्रीने एका व्हिडीओद्वारे दिली. त्यामुळेच ती कोणत्याही मुलाखतीत किंवा सोशल मीडियावर सक्रिय दिसली नाही.

तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती खूप थकलेली दिसत होती. बोलताना अनुश्री म्हणाली की, बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर सुरुवातीचे दोन दिवस ती ठीक होती. मात्र, वातावरणात बदल झाल्यानंतर तिची प्रकृती अचानक खराब झाली.

अनुश्रीने सांगितलं की, पूर्णपणे बरी व्हायला अजून किती वेळ लागेल हे सध्या सांगता येणार नाही. पण लवकरच ती ठणठणीत बरी होऊन पुन्हा चाहत्यांशी जोडली जाईल. त्यानंतर तिचे अपडेट्स आणि मुलाखती चाहत्यांना पाहायला मिळतील, असंही तिने स्पष्ट केलं.

अनुश्री मानेने बिग बॉसच्या घरात संपूर्ण सीझनमध्ये दमदार खेळ केला. निर्भीड स्वभाव आणि स्पष्ट भूमिकेमुळे तिला ‘शेरनी’ हा किताब मिळाला होता. प्रत्येक टास्कमध्ये तिने जोरदार लढत दिली आणि टॉप 5 पर्यंत मजल मारली.

आता तिची प्रकृती लवकर सुधारावी, अशी प्रार्थना चाहते करत आहेत. त्याचबरोबर बिग बॉसनंतर अनुश्री कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार, याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page