Badshah Wedding: रॅपर बादशाह पुन्हा लग्नबंधनात? व्हायरल फोटोंमुळे चर्चेला उधाण

Badshah Wedding: प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या गाण्यांमुळे नेहमीच तो चर्चेत असतो, पण यावेळी कारण वेगळंच आहे. सोशल मीडियावर त्याचे आणि अभिनेत्री ईशा रिखी हिचे काही फोटो आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत.

या व्हायरल फोटोंमुळे दोघांनी गुपचूप लग्न केल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. चाहत्यांमध्येही याबाबत मोठी उत्सुकता दिसून येत आहे.

समोर आलेल्या फोटोंमध्ये दोघेही पारंपरिक लग्नाच्या पोशाखात दिसतात. ईशाने लाल रंगाचा सलवार सूट घातला असून ती खूप सुंदर दिसते. तर बादशाहने हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. दोघांच्या गळ्यात वरमाला दिसत असून ते लग्न विधी करत असल्यासारखे फोटो आहेत.

विशेष म्हणजे हे फोटो बादशाह किंवा ईशाने स्वतः शेअर केलेले नाहीत. हे फोटो ईशाची आई पूनम रिखी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केल्याचं समोर आलं आहे. त्यांनी फोटो शेअर करत “देव तुम्हाला सुखी ठेवो” असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे या चर्चेला आणखी उधाण आलं आहे.

मात्र, या लग्नाबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे हे खरोखर लग्न आहे की कोणत्या कार्यक्रमातील फोटो, याबाबत स्पष्टता नाही.

दरम्यान, हे बादशाहाचं पहिलं लग्न नाही. त्याचं खरं नाव आदित्य प्रतीक सिंग सिसोदिया आहे. यापूर्वी त्याने जस्मिन मसिहसोबत लग्न केलं होतं. २०१२ मध्ये लग्न झाल्यानंतर दोघे २०१७ मध्ये वेगळे झाले आणि २०२० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगीही आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page