Bigg Boss Marathi 6: दहाव्या आठवड्यात मोठा धक्का, संस्कृतीचा प्रवास संपला

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी ६’मध्ये गेल्या काही आठवड्यांपासून सतत धक्कादायक एलिमिनेशन पाहायला मिळत आहेत. आठव्या आठवड्यात रुचिता जामदार बाहेर पडली, तर नवव्या आठवड्यात प्राजक्ता शुक्रेचा प्रवास संपला. त्यामुळे दहाव्या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

या आठवड्यात संस्कृती, विशाल, सागर, रेवा, प्रभू, राकेश आणि दीपाली हे सदस्य नॉमिनेट झाले होते. ‘भाऊच्या धक्क्यावर’ झालेल्या भागात अखेर एक मोठा निर्णय समोर आला आणि एका स्पर्धकाला घर सोडावं लागलं.

दरम्यान, या भागात काही टास्कही खेळवण्यात आले. तराजू टास्कमध्ये तन्वी, अनुश्री आणि राखी यांचा वरचष्मा दिसला. त्यानंतर सागरला त्याचा राग व्यक्त करण्यासाठी एक वेगळी संधी देण्यात आली. सागरने खोलीत जाऊन वस्तू फोडत आपला राग व्यक्त केला.

सागरने थेट सांगितलं की, त्याला आता घरातून बाहेर जायचं आहे. त्याच्या मते, हा शो फक्त जिंकण्यासाठी नाही तर स्वतःला ओळखण्यासाठी आहे. यावर रितेशने त्याला शांत करत अजून वेळ आहे, प्रेक्षकच विजेता ठरवतात आणि त्याच्यात क्षमता आहे, असं समजावलं.

यानंतर नॉमिनेटेड सदस्यांमधून संस्कृती, रेवा, दीपाली आणि प्रभू हे डेंजर झोनमध्ये आले. घरातील अनेकांना संस्कृती बाहेर जाईल असा अंदाज होता.

शेवटी प्रेक्षकांच्या व्होटिंगनुसार आणि घरातील मतांनुसार संस्कृती साळुंके हिला दहाव्या आठवड्यात एलिमिनेट करण्यात आलं. वाईल्ड कार्ड एन्ट्री असूनही तिचा गेम ठळकपणे दिसला नाही, अशी चर्चा होती.

आता घरात विशाल, राकेश, दीपाली, तन्वी, प्रभू, सागर, रेवा, संकेत, अनुश्री आणि राखी हे टॉप १० स्पर्धक उरले आहेत. पुढील आठवड्यांत स्पर्धा आणखी रंगणार, हे निश्चित आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page