बिग बॉसच्या घरात ड्रामा! राकेश-तन्वीचा डान्स पाहून राखी सावंत रडली

Rakhi Sawant: बिग बॉस मराठीमध्ये ड्रामा आणि भावनिक क्षणांची मालिका सुरूच आहे. ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत घरात आल्यापासून वातावरण पूर्णपणे बदललं आहे. तिच्या प्रत्येक कृतीची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते.

गेल्या काही दिवसांपासून राखी आणि राकेश बापट यांच्यात मजेशीर फ्लर्टिंग पाहायला मिळत होतं. मात्र आता समोर आलेल्या नवीन प्रोमोमध्ये एक वेगळंच चित्र दिसत आहे.

कलर्स मराठीच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये राकेश बापट आणि तन्वी कोलते रोमॅन्टिक डान्स करताना दिसतात. डान्सदरम्यान राकेश तन्वीच्या गालावर किस करतो. हे सगळं राखीसमोरच घडतं. हा प्रकार पाहिल्यानंतर राखी स्पष्टपणे दुखावलेली दिसते.

राकेशने राखीला चिडवण्यासाठी हे केल्याचंही प्रोमोमध्ये जाणवतं. पण त्यानंतर वातावरण अचानक बदलतं. रागाच्या भरात राखी स्वतःचे केस कापताना दिसते. तिचा हा अवतार पाहून घरातील सदस्यही आश्चर्यचकित होतात.

राकेश तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. त्यावर राखी म्हणते, “मी स्वतःलाच शिक्षा देतेय.” कोणालाही मला दुखावू देणार नाही, पण मी स्वतःला दुखावू शकते, असं म्हणत ती जोरात रडू लागते.

यानंतर दीपाली आणि तन्वी तिला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. या सगळ्या प्रकारामुळे राकेशलाही धक्का बसल्याचं प्रोमोमध्ये दिसून येतं.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page