राखी सावंत आली आणि गेम बदलला, नेटकरी म्हणाले ‘अब मजा आयेगा’

Rakhi Sawant Enters Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी’ सीझन 6 मध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एंटरटेन्मेंट क्वीन राखी सावंतने घरात एन्ट्री घेतली असून ती या सीझनची पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक ठरली आहे. कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. अनेक नेटकऱ्यांनी “अब मजा आयेगा” अशा कमेंट्स करत उत्साह व्यक्त केला आहे.

प्रोमोमध्ये राखी हटके अंदाजात घरात येताना दिसते. तिने गोल्डन रंगाचा नागिन ड्रेस घातला असून तिचा लूक पाहून घरातील सदस्य थक्क होतात. राखीची एन्ट्री होताच घरात हशा आणि गोंधळ दोन्ही पाहायला मिळतो.

राखी राकेश बापटकडे पाहून मजेशीर अंदाजात “राsssकेssश बाssप” असं म्हणते. त्यावर राकेश तिला ताई म्हणून हाक मारतो. त्यानंतर ती तन्वीकडे पाहून तिचं नाव चुकवते. जेव्हा तन्वी कोलते असं सांगते, तेव्हा राखी लगेच म्हणते, “तन्वी कोलते आता मी तुला सोलते.” हे ऐकताच घरात सगळे जोरात हसतात.

राखीच्या आगमनाने सदस्यांना मोठा धक्का बसला आहे. ती म्हणते की, बिग बॉस तिच्याशिवाय अपूर्ण आहे. “मी घरात आले की सगळं बदलतं. आता फक्त राखीची मर्जी चालणार,” असंही ती म्हणते. त्यामुळे आता बिग बॉस मराठी 6 चे पुढचे भाग आणखी रंगतदार होणार आहेत, असं प्रेक्षकांना वाटत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page