Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी 6’च्या पहिल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने अनेक स्पर्धकांची शाळा घेतली. घरात विनाकारण वाद घालणाऱ्यांना त्याने स्पष्ट शब्दांत सुनावलं. सर्वात आधी त्याने तन्वी कोलतेला खडेबोल सुनावले. त्यानंतर रुचिता जामदारचीही कानउघडणी केली.
याच वेळी रितेशने सागर कारंडे, प्रभू शेळके, सोनाली राऊत आणि करण सोनावणे यांच्या गेमप्लॅनचं कौतुक केलं. तर आयुष संजीव, राकेश बापट आणि राधा पाटील यांना अधिक आक्रमक खेळण्याचा सल्ला दिला.
सुरुवातीला समज देऊन झाल्यावर रितेशने स्पर्धकांसोबत मजेदार खेळही खेळले. त्यानंतर वेळ आली एलिमिनेशनची. पहिल्या आठवड्यात एकूण नऊ स्पर्धक नॉमिनेट झाले होते, त्यामुळे कोण बाहेर जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
मात्र रितेशने मोठा निर्णय घेतला. पहिल्या आठवड्यात कोणीही बेघर झालेलं नाही. हा आठवडा ‘No Elimination Week’ ठरला. पण यामागे एक मोठा ट्विस्ट आहे.
जे नऊ स्पर्धक पहिल्या आठवड्यात नॉमिनेट होते, तेच नऊ स्पर्धक दुसऱ्या आठवड्यातही नॉमिनेट राहणार आहेत. पहिल्या आठवड्याचे आणि दुसऱ्या आठवड्याचे मिळालेले व्होट्स एकत्र मोजले जाणार आहेत. त्यात सर्वात कमी मतं मिळालेल्या सदस्याचा प्रवास संपणार आहे.
या नऊ स्पर्धकांमध्ये दिपाली सय्यद, सागर कारंडे, रोशन भजनकर, रुचिता जामदार, करण सोनावणे, अनुश्री माने, दिव्या शिंदे, राधा पाटील आणि प्रभू शेळके यांचा समावेश आहे. बाकी स्पर्धक दुसऱ्या आठवड्यात सुरक्षित असतील. घराची पहिली कॅप्टन म्हणून प्राजक्ता शुक्रेची निवड झाली आहे.
आता पुढील आठवड्यात घरात काय घडणार, कोणाचा प्रवास संपणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘बिग बॉस मराठी 6’ हा शो दररोज रात्री 8 वाजता ‘कलर्स मराठी’ आणि ‘जिओहॉटस्टार’वर पाहता येतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
