Bigg Boss Marathi 6: सध्या छोट्या पडद्यावर ‘बिग बॉस मराठी 6’ ची जोरदार चर्चा आहे. या सीझनमध्ये अनेक नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे तन्वी कोलते. याआधी ती ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत दिसली होती. मात्र तिने ती मालिका सोडून थेट बिग बॉसच्या घरात प्रवेश केला.
अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तन्वीने तिच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. रिलेशनशिप, ब्रेकअपपासून ते वडिलांच्या आजारापर्यंत अनेक गोष्टी तिने उघड केल्या. यासोबतच नातेवाईकांनी त्यांच्या कुटुंबाशी कसा वागणूक दिली, हेही तिने सांगितले.
तन्वी म्हणाली की तिचा खरा संघर्ष वडील आजारी पडल्यानंतर सुरू झाला. “आधी मी आईवडिलांसाठी गप्प बसायचे. पण पप्पा आजारी पडल्यानंतर माझ्यात खूप बदल झाला,” असं ती म्हणाली. करोना काळात तिचे वडील गंभीर आजारी पडले होते. त्या वेळी ऑपरेशन करायचं की नाही, यावर डॉक्टरांमध्येही मतभेद होते.
ती पुढे म्हणाली, “आम्ही ऑपरेशन नको म्हणत असताना काही लोक म्हणत होते, ऑपरेशन करायलाच हवं. तुम्हाला तुमचा बाप नकोय का? आणि जेव्हा ऑपरेशन केलं, तेव्हा तीच माणसं म्हणू लागली की कशाला केलं, त्यामुळेच ते गेले.”
हे ट्युमरचं ऑपरेशन होतं. तन्वी म्हणते, “जे काही केलं, त्याच्या उलटच लोक बोलत होते. आधी समजत नव्हतं की असं का बोलतायत. पण नंतर कळलं की आपण काहीही चांगलं केलं तरी काही लोक नेहमी उलटच दाखवतात.”
तन्वीचा हा अनुभव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्या आयुष्यातील हा भावनिक काळ अनेकांना स्पर्शून गेला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
