Rakhi Sawant: बिग बॉस मराठीमध्ये आजपासून सातव्या आठवड्याची सुरुवात होत आहे. नुकताच सचिन कुमावत शोमधून बाहेर पडला. त्यामुळे घरातील समीकरणं बदलताना दिसत आहेत. सातव्या आठवड्यात काय नवीन घडणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
राखी सावंत आल्यापासून घरात रोज काही ना काही घडत आहे. आता बिग बॉसने तिला एक सिक्रेट टास्क दिला आहे. हा टास्क ऐकून घरात नवा ट्विस्ट येणार हे स्पष्ट झालं आहे.
बिग बॉसने राखीला कन्फेशन रूममध्ये बोलावलं. तिथे तिला गुप्त आदेश देण्यात आला. तन्वीच्या ताब्यात असलेला ‘तंतोतंत’ शब्द लिहिलेला टी-शर्ट तिला तिच्या नकळत स्वतःकडे घ्यायचा आहे, असा आदेश देण्यात आला.
हा टास्क पूर्ण करणं सोपं नाही. कारण तन्वीही सावध आहे. टास्क सुरू करताना राखी आधी गोड बोलून तिच्याकडून टी-शर्ट पाहण्याची विनंती करते. “तुझा तो टी-शर्ट दाखव ना,” असं ती म्हणते. पण तन्वी लगेचच शंका व्यक्त करते. “तुझ्या डोक्यात नेमकं काय चाललंय?” असा उलट प्रश्न ती विचारते.
यानंतर राखी संपूर्ण घरात टी-शर्ट शोधताना दिसते. वॉशरूम एरियातही ती शोधाशोध करते. मात्र प्रोमोमध्ये तरी तिच्या हाती काही लागत नाही, असं दिसतं.
आता हा सिक्रेट टास्क राखी पूर्ण करणार का, की यामध्ये वेगळाच ट्विस्ट येणार, हे आजच्या भागात स्पष्ट होईल.
दरम्यान, या प्रोमोवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना वाटतं की राखीला टी-शर्ट सापडणार नाही. तर काही जण तिच्या गेमचं कौतुक करत आहेत.
घरात दुसरीकडे आणखी एक वाद रंगताना दिसणार आहे. प्राजक्ता आणि प्रभू यांच्यात ‘Power Key’वरून तणाव वाढला आहे. प्राजक्ताची चावी सध्या प्रभूकडे आहे. ती परत देण्यास त्याने नकार दिल्यामुळे दोघांमध्ये जोरदार वाद होणार असल्याचं प्रोमोमध्ये दाखवलं आहे.
सातव्या आठवड्याची सुरुवातच वाद आणि टास्कने होत असल्यामुळे Bigg Boss Marathi 6 मध्ये पुढे काय घडणार, याची उत्सुकता वाढली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
