श्रेयस तळपदे बिग बॉसच्या घरात जाणार का? चर्चांवर स्वतःचं भाष्य

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी ६ चा बिगुल वाजला असून अवघ्या काही दिवसांवर शोचा प्रीमियर येऊन ठेपला आहे. त्यामुळे नव्या सीझनमध्ये कोणते चेहरे घरात दिसणार, याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

याच चर्चांमध्ये आता अभिनेता आणि निर्माता श्रेयस तळपदे याचं नाव समोर आलं. बिग बॉस मराठी सीझन ६ मध्ये श्रेयस सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मनोरंजन वेबसाईट पिंकविलाने याबाबतचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट शेअर केल्याने चर्चांना आणखी उधाण आलं.

रिपोर्टनुसार, श्रेयस आणि बिग बॉस मराठीचे मेकर्स यांच्यात चर्चा सुरू असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या बातम्यांवर आता स्वतः श्रेयस तळपदेने प्रतिक्रिया दिली आहे.

झूम चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत श्रेयस म्हणाला की, या सगळ्या खोट्या अफवा आहेत. आजकाल असं काहीही पसरवलं जातं आणि कलाकारांना लगेच टार्गेट केलं जातं. काही लोक केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी अशा चर्चा पसरवतात, असंही त्याने स्पष्ट केलं.

श्रेयस तळपदेने आजवर मराठी आणि हिंदी दोन्ही सिनेसृष्टीत विविध भूमिका साकारल्या आहेत. मालिका, नाटक, मराठी सिनेमा यासोबतच बॉलिवूडमध्येही त्याने आपली छाप सोडली आहे. ‘इकबाल’, ‘डोर’सारख्या चित्रपटांनी त्याला वेगळी ओळख मिळाली.

‘ओम शांती ओम’मधील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. मराठीतही त्याने अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रात उल्लेखनीय काम केलं आहे. त्यामुळे बिग बॉस मराठी ६मध्ये त्याच्या नावाची चर्चा होणं साहजिकच आहे.

मात्र सध्या तरी बिग बॉस मराठी ६ मध्ये श्रेयस तळपदे सहभागी होणार नाही, हे त्याच्या वक्तव्यातून स्पष्ट झालं आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page