Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी ६’ सुरू होण्यासाठी आता मोजकेच दिवस उरले आहेत. अवघ्या चार दिवसांत घराची दारं उघडणार आहेत. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक दिसणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढत आहे.
आत्तापर्यंत सागर कारंडे, सोनाली राऊत, प्राजक्ता शुक्रे, संकेत पाठक, अनुश्री माने, दीपाली सय्यद, राधा मुंबईकर आणि रसिका जामसुदकर अशी अनेक नावं चर्चेत आहेत. आता या यादीत आणखी दोन चर्चेतील नावांची भर पडली आहे.
ईटाइम्सच्या वृत्तानुसार, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता राकेश बापट यंदा ‘बिग बॉस मराठी ६’ मध्ये दिसणार आहे. या मालिकेमुळे राकेशला मोठी लोकप्रियता मिळाली. याआधी तो ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सहभागी झाला होता. तसेच सलमान खानच्या ‘बिग बॉस 15’ मध्येही त्याने वाइल्ड कार्ड एन्ट्री केली होती. त्यामुळे त्याला बिग बॉसच्या खेळाचा अनुभव आहे.
याशिवाय, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कंटेट क्रिएटर करण सोनावणे हाही यंदाच्या सीझनचा भाग असणार असल्याची माहिती समोर येतेय. करण ‘Focused Indian’ या नावाने ओळखला जातो आणि त्याची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राकेश बापटची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. तर करण सोनावणेने नुकतीच शेअर केलेली एक इंस्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आहे. त्या पोस्टमध्ये त्याने 2026 वर्षाबद्दल संकेत दिले असून, पुढील काही महिन्यांत मोठा प्रवास पाहायला मिळेल, असं म्हटलं आहे.
आता हे दोघे ‘बिग बॉस मराठी ६’ च्या घरात नेमकं काय करणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
