Payal Gaming: देशातील प्रसिद्ध गेमिंग इन्फ्लूएन्सर पायल गेमिंग सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहे. सोशल मीडियावर एक 19 मिनिटांचा व्हिडीओ व्हायरल होत असून, त्याच्याशी पायलचं नाव चुकीच्या पद्धतीने जोडलं जात आहे. या प्रकारामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.
व्हायरल होत असलेल्या या एमएमएसमध्ये एका महिला आणि पुरुषाचे खासगी क्षण दिसत आहेत. मात्र, त्या व्हिडीओतील महिला पायल असल्याचा दावा काही युजर्स करत आहेत. यामुळे पायलला मानसिक त्रास सहन करावा लागत असून तिने या प्रकरणावर थेट भूमिका मांडली आहे.
पायलने स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की, त्या व्हिडीओमधील महिला ती नाही. सोशल मीडियावर माझ्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात मी कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही तिने स्पष्ट केलं.
आपल्या पोस्टमध्ये पायल म्हणाली की, मला कधीच वाटलं नव्हतं की इतक्या खासगी आणि वेदनादायी विषयावर सार्वजनिकपणे बोलावं लागेल. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चुकीचा कंटेट पसरवला जात आहे. त्या व्हिडीओशी माझा कोणताही संबंध नाही. माझं आयुष्य, माझी ओळख आणि माझी निवड याच्याशी त्या व्हिडीओचा काहीही संबंध नसल्याचं तिने ठामपणे सांगितलं.
पायलने हेही नमूद केलं की, ती सहसा नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करते. मात्र, या वेळी गप्प बसणं शक्य नाही. हा प्रकार फक्त माझ्यापुरता मर्यादित नाही. अशा ऑनलाईन गैरवापराची शिकार होणाऱ्या अनेक महिलांसाठी आवाज उठवणं गरजेचं आहे, असं तिने म्हटलं आहे.
शेवटी पायलने सर्वांना कळकळीची विनंती केली आहे. कृपया तो व्हिडीओ कुणालाही शेअर करू नका. त्यावर कमेंट किंवा चर्चा करू नका. या कठीण काळात मला साथ दिली, सहानुभूती दाखवली आणि धीर दिलेल्या सर्वांचे तिने आभार मानले आहेत. अशा प्रसंगी माणुसकी आणि विश्वास मोठी ताकद देतात, असंही तिने सांगितलं.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
