भारतीय सिनेमात नवीन इतिहास; गोंधळ चा २५ मिनिटांचा वन-टेक सीन चर्चेत

Gondhal Movie: ‘गोंधळ’ हा मराठी चित्रपट सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेत आहे. दमदार कथा, मोठा स्केल आणि मजबूत अभिनय यामुळे चित्रपट आधीच लोकांच्या नजरेत आला होता. पण आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. चित्रपटाच्या पहिल्या हाफमध्ये तब्बल २५ मिनिटांचा वन-टेक सीन शूट करण्यात आला असून हे भारतीय चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच घडलं आहे.

हा वन-टेक रेकॉर्ड साधण्यासाठी टीमने सात दिवसांची सलग मेहनत घेतली. रात्रीचे चित्रीकरण, मोठं सेटअप आणि अचूक समन्वय अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. दिग्दर्शक संतोष डावखर सांगतात की प्रत्येक छोट्या तपशीलावर लक्ष द्यावं लागत होतं. ३०० पेक्षा जास्त जुनिअर्स, पाऊण किलोमीटरचा लाईटिंग सेटअप, पाच जनरेटर आणि पेट्रोलचे टँकर—या सगळ्यामुळे हा टेक अखेर यशस्वी झाला. त्यांच्या म्हणण्यानुसार, इतका मोठा सीन एकाच टेकमध्ये सुरळीत चालणं म्हणजे जादूच होती.

मराठी चित्रपटांमध्ये यापूर्वी वन-टेक सीन झाले असले, तरी इतक्या मोठ्या कालावधीचा अखंड टेक पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. हा फक्त तांत्रिक प्रयोग नाही, तर प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव आहे. ‘गोंधळ’ची कथा, पटकथा आणि संवाद संतोष डावखर यांनीच लिहिले असून, चित्रपटाचं निर्मिती डावखर फिल्म्सने केलं आहे. सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत.

चित्रपट महाराष्ट्राच्या संस्कृतीपासून मानवी नातेसंबंधांपर्यंत विविध भावभावना दाखवतो. नाट्य आणि थराराचा मिश्रण असलेल्या या कथेमुळे प्रेक्षक सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतून राहतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘बर्डमॅन’ आणि ‘१९१७’सारख्या चित्रपटांनी वन-टेक शैलीला उंच स्थान दिलं आहे आणि ‘गोंधळ’ही तसं धाडसी पाऊल टाकतो.

किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी यांसह अनेक अनुभवी कलाकारांनी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. सध्या चित्रपटाला मिळणारा वर्ड ऑफ माऊथ प्रतिसाद जोरदार असून अनेक ठिकाणी शोजही वाढवले गेले आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page