Dhanashri Kadgaonkar Meets Raj Thackeray: अभिनेत्री धनश्री काडगांवकरने अलीकडेच राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट दिली. मराठी मालिकांमधून ओळख मिळवलेली धनश्री, ‘तुझ्यात जीव रंगला’ आणि ‘तू चाल पुढं’मुळे घराघरात पोहोचली. आता ती ‘लास्ट स्टॉप खांदा’ या नवीन मराठी चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमातील ‘अगं शालू…’ हे गाणं याआधीच सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहे.
धनश्रीने राज आणि शर्मिला ठाकरे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले. पोस्टमध्ये तिने लिहिले की, “अनेक वर्ष ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण आज मिळाला. शर्मिला वहिनींची भेट तर झालीच, पण राज साहेबांना प्रत्यक्ष भेटताना त्यांच्या नावातील करिष्मा आणि जरब अजूनच जाणवली.”
तिने पुढे लिहिले की, “साहेबांनी ‘लास्ट स्टॉप खांदा’च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मनापासून आभार.” तिने #overwhelmingmoment असा हॅशटॅगही वापरला. फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी कमेंटमध्ये तिचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले. अनेकांनी सिनेमासाठीही शुभेच्छा दिल्या.
या भेटीत फक्त धनश्रीच नव्हे तर चित्रपटातील इतर कलाकारही उपस्थित होते. विनीत परुळेकर दिग्दर्शित या सिनेमात निखिल बने, प्रभाकर मोरे, श्रमेश बेटकर, जुईली टेमकर, मंदार मांडवकर आणि शशिकांत केरकर महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 21 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
