Chinmayee Sumit: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. कारण म्हणजे तिचं एका कार्यक्रमादरम्यान केलेलं वक्तव्य – “होय, मी जय भीमवाली आहे.” या एका वाक्यानंतर अभिनेत्रीचं नाव सर्वत्र चर्चेत आलं आहे.
पालघर जिल्ह्यात नुकतंच अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने तेरावं राज्य अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात चिन्मयी सुमित हजर होती. याच कार्यक्रमात ती म्हणाली, “मी नमस्कार म्हटल्यानंतर लगेच जय भीम म्हणते. त्यामुळे अनेक लोक विचारतात, ‘तुम्ही जय भीम वाले आहात का?’ त्यांना सांगायचं आहे की होय, मी आहे — म्हणजेच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आहे.”
या विधानानंतर सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या धाडसाचं आणि स्पष्टवक्तेपणाचं कौतुक होत आहे. चिन्मयी पुढे म्हणाली, “अनेकांना नेते-महापुरुष आवडतात, तशीच मला बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा मिळते. प्रत्येक महिलेनं ‘जय भीम’ असं म्हणावं, ही भावना मनात ठेवून मी ते बोलते. राज्यघटनेने महिलांना माणसाचा दर्जा दिला, आणि त्या राज्यघटनेचे निर्माते बाबासाहेब आहेत, म्हणून मी नमस्कारानंतर जय भीम म्हणते.”
अभिनेत्रीच्या या वक्तव्यावर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिच्या विचारांचं स्वागत केलं, तर काहींनी हे धाडसपूर्ण असल्याचं म्हटलं.
चिन्मयी सुमित ही मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमधील ओळखीचं नाव आहे. तिने ‘फास्टर फेणे’, ‘मुरांबा’, ‘पोर बाजार’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच ‘प्रेमा तुझा रंग कसा’ आणि ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही ती झळकली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
