ठरलं तर मग मालिकेत 16 सप्टेंबरच्या भागात मोठे ट्विस्ट पाहायला मिळाले. सुरुवातीला घरचे सर्वजण अर्जुनवर ओरडतात कारण तो सायलीकडे दुर्लक्ष करतो. मात्र अर्जुन आपली चूक मान्य करून सायलीचं कौतुक करतो. दोघे नंतर रूममध्ये एकांतात वेळ घालवतात. यावेळी सायली अर्जुनला बाळाबाबत लिहिलेल्या चिठ्ठीबद्दल विचारते. अर्जुनला काहीच माहिती नसल्याने ती त्याला सर्व सांगते. तेव्हा अर्जुन स्पष्ट करतो की त्याला मुलगी हवी आहे. यानंतर दोघांचे रोमँटिक क्षण रंगतात.
दुसरीकडे प्रिया तुरुंगातून सुटते आणि आपल्या घरी जाण्याची स्वप्नं रंगवते. मात्र अश्विन तिला समजावतो की तिथे आपल्याला स्वीकारलं जाणार नाही. तरीही प्रियाला ऐशोआराम हवा असल्याने ती सुभेदारांच्या घरी जाण्याचा हट्ट धरते. शेवटी अश्विनही तयार होतो.
दरम्यान, महिपत साक्षीला भेटतो. तिच्या प्रश्नांना उत्तर देताना तो सांगतो की प्रियाची सुटका झाली आहे. हे ऐकून साक्षी हादरते. महिपत कबूल करतो की प्रियाने त्याला जाळ्यात अडकवलं आणि कोर्टात त्याच्या विरोधात पुरावा तयार केला.
याचवेळी सुभेदारांच्या घरात सायली भजी करत असते. अस्मिताच्या तब्येतीमुळे तिला फक्त एक भजी दिली जाते. अचानक जोराचा वारा सुरू होतो आणि त्याच क्षणी प्रिया आणि अश्विन दारापाशी पोहोचतात. त्यांना पाहून घरातील सगळेच थक्क होतात.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
