‘बिग बॉस 19’च्या वीकेंड वॉरच्या भागात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार खास पाहुणा म्हणून आला होता. शोमध्ये त्याने मराठीत बोलत कॉमेडियन प्रणित मोरेचं कौतुक केलं.
प्रणितने सुरुवातीपासूनच आपल्या विनोदी शैलीने घरात वेगळी छाप सोडली आहे. हिंदी भाषिक स्पर्धकांमध्ये तो मराठी रंग भरताना दिसतो, यामुळे प्रेक्षकांमध्ये त्याचं वेगळं स्थान तयार झालं आहे.
एका टास्कदरम्यान अक्षयने प्रणितला हसत म्हणालं – “ओ भाऊ, मला खूप आवडतं तुझं काम. मी सगळं बघतो.” त्याच वेळी त्याने दांडा लावण्याची जबाबदारीही प्रणितकडे सोपवली.
अक्षय पुढे मजेत म्हणाला की, “सलमानवर केलेल्या तुझ्या रोस्टिंग रील्स पाहिल्या आहेत. माझ्यावरचे व्हिडिओही बघितले. शो संपल्यावर आम्ही सगळे बाहेर वाट पाहतोय.” शेवटी तो हसत म्हणाला की हे फक्त विनोद आहे, आणि प्रेक्षकांना हसवणं ही खरं तर खूप छान गोष्ट आहे.
या भागात पहिल्यांदाच दोन स्पर्धक बाहेर पडले. नतालिया आणि नग्मा मिराजकर एलिमिनेट झाल्या. नग्माचं नाव आल्यानंतर तिचा पार्टनर आवेझ भावुक झाला. शो सोडताना नग्माने आवेझला किस करून सांगितलं – “मी बाहेर जात आहे आपल्या लग्नाची तयारी करण्यासाठी.”
यावेळी ‘जॉली एलएलबी 3’ चित्रपटातील कलाकार अरशद वारसी, सौरभ शुक्ला आणि फराह खानही शोमध्ये सहभागी झाले होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
