‘दशावतार’ची ओपनिंग शानदार, पण ‘आरपार’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’ची कमाई एवढीच

शुक्रवारी, १२ सप्टेंबरला एकाच दिवशी तीन मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर आले – ‘दशावतार’, ‘आरपार’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’. एकाच वेळी तीन चित्रपट रिलीज करणं हा धाडसी निर्णय ठरला. सध्या प्रेक्षक मराठी सिनेमांकडे पाठ फिरवत असल्याची चर्चा असताना, या स्पर्धेत कोणता चित्रपट वरचढ ठरला याकडे सगळ्यांचं लक्ष होतं.

‘बिन लग्नाची गोष्ट’ मध्ये उमेश कामत आणि प्रिया बापट पुन्हा एकदा एकत्र झळकले आहेत. त्यांच्यासोबत गिरीश ओक, निवेदिता सराफ, संजय मोने, सुकन्या मोने यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. नितीन वैद्य निर्मित आणि आदित्य इंगळे दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच दिवशी साधारण ८ लाखांची कमाई केली आहे.

‘आरपार’ या चित्रपटात ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत आहेत. सोबत माधव अभ्यंकर, सुहिता थत्ते, स्नहलता वसईकर यांच्याही भूमिका आहेत. गौरव पत्की यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने पहिल्या दिवशी साधारण १३ लाख रुपयांची कमाई केली.

पण खऱ्या अर्थाने चर्चेत राहिला तो ‘दशावतार’. दिलीप प्रभावळकर यांच्या प्रमुख भूमिकेसोबत महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, रवी काळे, अभिनय बेर्डे, सुनील तावडे अशा मोठ्या कलाकारांनी सजलेला हा चित्रपट पहिल्याच दिवशी ६५ लाख रुपयांची कमाई करत वरचढ ठरला.

अकडेवारीवरून स्पष्ट होतं की, तीनही चित्रपटांपैकी ‘दशावतार’नेच प्रेक्षकांची मने जिंकली, तर ‘आरपार’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटांची सुरुवात मात्र तुलनेने सुमार राहिली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page