हार्दिक जोशी–वीणा जगताप यांच्या प्रमुख भूमिका; ‘अरण्य’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

सत्य घटनांनी प्रेरित मराठी चित्रपट ‘अरण्य’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये जंगलातील थरार, संघर्षमय जीवन आणि नात्यांची गुंफण प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे.

चित्रपटाची कथा फक्त थरारक नाही, तर बाप-लेकीच्या नात्याला स्पर्शून जाणारी आहे. नक्षलवादामुळे उद्ध्वस्त होत चाललेले आयुष्य आणि जंगलातील धडकी भरवणारा संघर्ष यामुळे हा प्रवास प्रेक्षकांना खिळवून ठेवणार, अशी झलक ट्रेलरमध्ये दिसते.

या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे तो गडचिरोलीच्या खऱ्या जंगलात शूट करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक विदर्भी लहेजा, जंगलातील वातावरण आणि अस्सल दृश्यांनी सिनेमाला वेगळाच वास्तवपणा दिला आहे. प्रेक्षकांना हा अनुभव पडद्यावर पाहताना जणू जंगलात प्रत्यक्ष जगल्यासारखा भास होईल.

निर्माते शरद पाटील म्हणाले, “‘अरण्य’ आमच्यासाठी एक जाणीव आहे. जंगलात प्रत्यक्ष शूट करणे हे आव्हानात्मक होतं, पण त्यातूनच सिनेमाला खरी ताकद मिळाली. सत्य, भावनिकता आणि थरार या चित्रपटात एकत्र गुंफले गेले आहेत. हा अनुभव प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ घर करून राहील, याची मला खात्री आहे.”

एस. एस. स्टुडिओ आणि एक्स्पो प्रस्तुत, अदिक फिल्म्सच्या साहाय्याने, अमोल दिगांबर करंबे लिखित व दिग्दर्शित या चित्रपटात हार्दिक जोशी, वीणा जगताप, हिृतीका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा, चेतन चावडा आणि अमोल खापरे यांच्या भूमिका आहेत. निर्माते शरद पाटील आणि अंजली पाटील असून, हा चित्रपट १९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page