मराठी चित्रपटसृष्टीत लवकरच नवा धमाल सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला असून प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय.
१९ सप्टेंबरला प्रदर्शित होणारा हा चित्रपट क्राइम आणि कॉमेडीचा अनोखा मेळ साधतो. एका खूनाच्या सुपारीभोवती फिरणारी कथा प्रेक्षकांना गुंतवून ठेवते. यात नातेसंबंध, प्रेमाचे वेगवेगळे पैलू आणि जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन दाखवण्यात आला आहे.
या सिनेमात मराठीतील दिग्गज कलाकार पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी आणि पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत विजय निकम, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर यांच्याही भूमिका महत्त्वाच्या आहेत.
दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. संगीताच्या बाबतीतही हा सिनेमा वेगळा ठरणार आहे. ‘सखूबाई’, ‘चंद्राची गोष्ट’, ‘जालीम सरकार’ आणि टायटल रॅप अशा चार गाण्यांना जावेद अली, सुनिधी चौहान, प्रेमराज सोनाली सोनावणे आणि एग्नेल रोमन यांचा आवाज लाभला आहे.
दिग्दर्शक विशाल गांधी म्हणाले, “मराठी सिनेमाची ताकद म्हणजे दर्जेदार आशय. त्यामुळे या चित्रपटातून काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. हा सिच्युएशनल कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांना नक्की आवडेल.”
‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटाचं छायांकन अमित सुरेश कोडोथ यांनी केलं आहे, तर संकलन रवी चौहान यांचं आहे. पटकथा, संवाद आणि मांडणीसाठी मोठी टीम काम करत असल्याने हा सिनेमा प्रेक्षकांना एक नवा अनुभव देईल अशी निर्मात्यांची अपेक्षा आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
