भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार (DPIFF) 2025 यावर्षी मुंबईत रंगणार आहे. हा सोहळा २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी दोन दिवस चालणार असून सिनेसृष्टीतील दिग्गज आणि नवोदित कलाकारांचा सन्मान केला जाणार आहे.
या वर्षीचा सोहळा विशेष ठरणार आहे कारण DPIFF आपल्या दहाव्या पर्वात पदार्पण करत आहे. भारतीय सिनेमाचे जनक धुंडीराज गोविंद फाळके यांच्या नावाने देण्यात येणारे हे पुरस्कार गेल्या काही वर्षांत चित्रपटसृष्टीसाठी मोठं व्यासपीठ बनले आहेत.
२०२४ मधील सोहळ्यात शाहरुख खान, करिना कपूर खान, राणी मुखर्जी, नयनतारा आणि शाहिद कपूर यांसारख्या मोठ्या कलाकारांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे या वर्षीही कोणते कलाकार हजेरी लावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दहाव्या पर्वानिमित्त या वेळी आणखी भव्य कार्यक्रम ठेवले गेले आहेत. भारतातील विविध भाषांतील चित्रपट, गीते आणि खास सादरीकरणे प्रेक्षकांसमोर येणार आहेत. तसेच ग्लोबल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल उपक्रम सुरूच राहणार असून जगभरातील दिग्दर्शक यात सहभागी होतील.
DPIFF चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मिश्रा यांनी सांगितले की, “या दहाव्या वर्षात आपण सिनेमाच्या जादूचा जागतिक उत्सव साजरा करणार आहोत. दिग्गज कलाकार, नवोदित सर्जक आणि प्रेक्षक एकत्र येऊन मनाला भिडणाऱ्या कथा सन्मानित करतील.”
या दोन दिवसीय कार्यक्रमातून भारतीय सिनेमाच्या परंपरेचा गौरव तर होईलच, पण जागतिक पातळीवर वाढत असलेल्या त्याच्या प्रभावाचाही ठसा उमटवला जाणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही शो आणि ओटीटीवरील नवीन अपडेट्स, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. वेगवान, स्पष्ट आणि फॅक्ट-बेस्ड रिपोर्टिंग करणं हे माझं वैशिष्ट्य आहे.
