मराठी मालिकांमध्ये टीआरपीची शर्यत नेहमीच रंगतदार असते. यंदाही स्टार प्रवाहच्या मालिकांनीच आघाडी घेतली आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या टीआरपीत थोडी घट झाली असली, तरीही तिने पहिलं स्थान कायम राखलं आहे. सतत येणारे ट्विस्ट आणि दमदार पात्रांमुळे ही मालिका अजूनही प्रेक्षकांची पहिली पसंती ठरतेय.
‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. मालिकेत ऐश्वर्याचं कारस्थान उघड होणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
यावेळी सर्वात मोठा बदल म्हणजे ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका थेट टॉप 3 मध्ये दाखल झाली आहे. जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्या यांच्या नात्यातील प्रेमकथा प्रेक्षकांना खूप भावतेय.
गेल्या आठवड्यात तिसऱ्या स्थानी असलेली ‘लक्ष्मीच्या पाउलांनी’ यंदा दोन स्थानांनी घसरून पाचव्या क्रमांकावर आली आहे. तर ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेनं चांगली झेप घेतली असून ती चौथ्या स्थानावर पोहोचली आहे.
दरम्यान, ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही मालिका अजून प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळवू शकलेली नाही. त्यामुळेच कथेत लग्नाचा नवा ट्रॅक आणण्याची तयारी सुरू आहे. मात्र, पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या ‘लपंडाव’ आणि ‘नशीबवान’ या नव्या मालिकांमुळे या मालिकेसमोरची स्पर्धा आणखी कठीण होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
