Dashavatar Movie: मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण! बहुप्रतिक्षित ‘दशावतार’ चित्रपटाचा भव्य टीझर आता थेट न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात गाजणारा हा सिनेमा आता जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे.
‘दशावतार’ हा फक्त एक सिनेमा नाही, तर महाराष्ट्राच्या परंपरा, संस्कृती आणि निसर्गाचा जागतिक सोहळा ठरत आहे. दमदार कथा, आधुनिक सिनेटेक्नॉलॉजी आणि दिग्गज कलाकारांची फौज या चित्रपटाला भव्यतेचं नवं परिमाण देत आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर आणि झी स्टुडिओ मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी या क्षणाला ऐतिहासिक म्हटलं आहे. “टाईम्स स्क्वेअरवरील टीझर हे आमच्या मेहनतीला मिळालेलं आंतरराष्ट्रीय यश आहे. हा आमच्या जागतिक प्रवासाचा पहिला टप्पा आहे,” असं त्यांनी सांगितलं.
या सिनेमात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, रवी काळे, सुनील तावडे यांसारखे दमदार कलाकार आहेत. संवाद आणि गाणी गुरु ठाकूर यांनी लिहिली असून, संगीताची जबाबदारी ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी सांभाळली आहे.
12 सप्टेंबरला रिलीज होणारा ‘दशावतार’ मराठी प्रेक्षकांसोबतच जगभरातील सिनेरसिकांना महाराष्ट्राची संस्कृती आणि भव्यता नव्याने दाखवणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
