Kurla To Vengurla Movie: गावांतील तरुणांची लग्नं का होत नाहीत, यावर आधारीत एक वेगळी कथा लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. “कुर्ला टू वेंगुर्ला” या मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांमध्ये त्याची चर्चा रंगली आहे. विजय कलमकर दिग्दर्शित हा चित्रपट १९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सिने कथा कीर्तन, चंद्रभागा स्टुडिओज आणि ऑरा प्रोडक्शन्स यांनी हा चित्रपट तयार केला आहे. निर्मात्यांमध्ये अमरजित आमले, विजय कलमकर, चारुदत्त सोमण, नयना सोनावणे, अविनाश सोनावणे आणि एम. व्ही. शरतचंद्र यांचा समावेश आहे. कथा, पटकथा आणि संवाद अमरजित आमले यांनी लिहिले आहेत, तर दिग्दर्शनाची जबाबदारी विजय कलमकर यांनी सांभाळली आहे.
कलाकारांमध्ये प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर आणि वैभव मांगले मुख्य भूमिकेत दिसतील. त्यांच्यासोबत सुनील तावडे, स्वानंदी टिकेकर आणि साईंकित कामतही झळकणार आहेत. छायांकन रंगनाथ बाबू गोगीनेनी यांनी केले असून, संकलन विजय कलमकर यांचे आहे. ध्वनिआरेखन अविनाश सोनावणे यांचे, तर गीत चंचल काळे आणि अमरजित आमले यांनी लिहिले आहेत. संगीत दिग्दर्शन अक्षय खोत यांनी केले आहे. चित्रपटाचं वितरण पिकल इंटरटेनमेंट करणार आहे.
चित्रपटात ग्रामीण आणि शहरी भागातील बदल, वाढत्या अपेक्षा आणि मुलांच्या लग्नांवर होणारा परिणाम यासारखे मुद्दे मांडले आहेत. कोकणात चित्रीत झालेल्या या कथेत स्थानिक लोकांचा स्वभाव, त्यांची भाषा आणि जीवनशैली खूप रंगतदार पद्धतीने दाखवली आहे.
माती आणि नाती जोडणारी ही कथा पाहण्यासाठी आता फक्त १९ सप्टेंबरचीच प्रतीक्षा आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
