Marathi Ukhane for Female
Marathi Ukhane for Female :अर्थपूर्ण आणि सांस्कृतिक परंपरांची एक महत्त्वाची अंश म्हणजे मराठी उखाणे. या पारंपारिक छंदांचा उपयोग विशेषतः लग्न किंवा इतर महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये केला जातो. उखाणे केवळ कविता नसून, त्यातल्या भावनांमध्ये आपल्या सांस्कृतिक वारशाचा ठसा असतो.
मराठी उखाणे म्हणजे काय? | Marathi Ukhane for Female
मराठी उखाणे म्हणजे छोटी, रिफ्रेन असलेली कवितेची पंक्ती जी वधू आणि वर लग्नाच्या वेळी वाचतात. या उखाण्यांमध्ये जोडप्याच्या प्रेमाची, आदराची आणि एकमेकांसाठीची भावना व्यक्त केली जाते. हे उखाणे त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळा अनुभव देतात आणि लग्नाच्या सोहळ्याला अनोखी चव देतात.
सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून
___ रावांचे नाव घेते पाच गडी राखून
भाजीत भाजी मेथीची,
___ माझ्या प्रितीची.
नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
.___च नाव आहे लाख रुपये तोळा
कळी हसेल फुल उमलेल, मोहरुन येईल सुगन्ध,
___ च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद
काचेच्या ग्लासात गुलाबी शरबत ___ राव गेले ऑफिसला मला नाही करमत
एक होति परि ___
नाव घेते आता जावा आपापल्या घरि
शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ति पेक्षा युक्ति ने,
___रावांच नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने
हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे
……. चे नाव घेते सत्यनारायणापुढे
गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
___ नाव घेते सोडा माझी वाट
ग़ूलाबाचे फुल दिसायला ताजे
___ नाव घेते सौभाग्य माझे
गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू झाला ___शी लग्न, देवाला बोलते थँक यू
चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ
समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू
……….राव दिसतात साधे पण आतून चालू.
मैत्रि आणी नात्यात नसावा स्वार्थ,
___ मुळेच माझ्या जीवनाला अर्थ…
सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खुण,
____रावांचे नाव घेते ___ची सून
जीवनाच्या रंगमंचावर सुरु झाली एकांकिका, ___रावांचे नाव घेते सर्वजणी ऐका
नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात…
___रावांचे नाव घेते, ___च्या दारात
नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू ___ चे नाव घ्यायला मी कशाला लाजू ..
इतिहासाच्या पुस्तकाला भुगोलाचे कव्हर, ___चे नाव घेते ___ची लव्हर.
कॉरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी, ___आहेत फार निस्वार्थी
सुखद वाटते हिवाऴ्यातले ऊन, ___ रावाचे नाव घेते ___ ची सुन
आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास ___ ला भरविते जिलेबिचा घास
To check other Marathi Content Creator, click here and Follow Us on Youtube.
Related Posts
Share This:
Hello, I’m Kiran Patil. I’m passionate about exploring the world of Marathi entertainment. From movies and serials to actors, actresses, and content creators, I enjoy bringing their stories and journeys to life. Sharing fun and engaging updates with readers is what I do best!