Savita Damodar Paranjpe Natak: मराठी रंगभूमीवर अनेक उत्तम नाटकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यातलं एक लोकप्रिय आणि लक्षवेधी नाटक म्हणजे ‘सविता दामोदर परांजपे’. शेखर ताम्हणे लिखित आणि राजन ताम्हणे दिग्दर्शित हे नाटक एकेकाळी प्रचंड गाजलं. आता तब्बल 40 वर्षांनंतर हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे.
काही दिवसांपूर्वी या नाटकाचा टीझर सोशल मीडियावर शेअर झाला आणि त्यानंतर या नाटकाची मोठी चर्चा सुरू झाली. त्या काळात या नाटकात रीमा लागू यांनी कुसुमची मुख्य भूमिका साकारली होती. त्यामुळे आता कुसुमची भूमिका कोण साकारणार याबद्दल उत्सुकता वाढली होती.
27 नोव्हेंबरला शेअर झालेल्या नव्या टीझरमध्ये कुसुमचा लूक दाखवण्यात आला आहे. चेहरा न दिसता हातातील घड्याळ, ब्रेसलेट, बांगड्या आणि मंगळसूत्र दिसतं. या भूमिकेसाठी अभिनेत्री मयुरी देशमुख यांचं नाव चर्चेत आहे. त्यांच्यासोबत आस्ताद काळे, संग्राम समेळ आणि ऋचा मोडक हे कलाकारही या नाटकात दिसणार असल्याची चर्चा आहे.
नाटकाचा पहिला प्रयोग 12 डिसेंबर 2025 रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे दुपारी 4 वाजता होणार आहे. निर्मिती मॅनमेकर्स इंडिया यांनी केली आहे.
या नाटकाचं कथानक शरद अभ्यंकर आणि त्याची पत्नी कुसुम यांच्या आयुष्याभोवती फिरतं. वर्षानुवर्षं लग्नानंतरही मूल होत नाही, आणि कुसुम सतत आजारी पडते. त्याच वेळी त्यांच्या घरात आलेल्या अशोकला कुसुमवर काहीतरी अलौकिक शक्तीचं सावट जाणवतं. मग सविता दामोदर परांजपे कोण? हे गूढ उलगडतं.
या नाटकावर आधारित चित्रपटही काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता, ज्यात सुबोध भावे, तृप्ती तोरडमल आणि राकेश बापट मुख्य भूमिकेत होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
