Suraj Chavan: बिग बॉस मराठी ५चा विजेता सुरज चव्हाण सध्या चर्चेत आहे. सुरजच्या आयुष्यात आता नवं पर्व सुरू होत आहे. तो लवकरच संजना गोफणे सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 29 नोव्हेंबर रोजी विवाहसोहळा पार पडणार असून लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे.
अलीकडेच संजनाच्या घरी घाणा भरण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात संजनानं अप्रतिम डान्स केला, आणि तिचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिरवी साडी आणि पारंपारिक दागिन्यांमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ लक्ष वेधून घेतोय. त्या व्हिडिओमध्ये संजनाच्या हातावर सुरजच्या नावाची मेहंदी रंगल्याचं पाहायला मिळतं. मेहंदीत ‘झापुक झुपूक’ असं लिहिलं असून हत्ती, मोर यांसारखे सुंदर डिझाइन्सही काढण्यात आले आहेत.
सुरज आणि संजनाचं लग्न सासवड-जेजुरी येथे पार पडणार असून संध्याकाळी 6.11 वाजता दोघे एकमेकांचे होणार आहेत. हे लव्ह मॅरेज असून संजना ही सुरजच्या मामाची मुलगी आहे. चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
