Prajakta Gaikwad: अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपासून तिच्या विवाहसोहळ्याच्या तयारीची चर्चा सुरू आहे. नुकताच तिचा मेंदी समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. सोशल मीडियावर या सोहळ्याचे फोटो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.
प्राजक्ताचं आणि शंभूराज खुटवड यांचं लग्न ठरलं असून, प्रत्येक कार्यक्रम थाटात साजरा होत आहे. मेंदीसाठी तिने खास मेंदी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. शंभूराजने पिवळ्या रंगाचं जॅकेट आणि पायजमा असा पारंपरिक लूक केला होता.
तिच्या मेंदीतील खास आकर्षण म्हणजे पालखीच्या डिझाईनमध्ये लिहिलेलं शंभूराज हे नाव. हा फोटो चाहत्यांनी खूप पसंत केला आहे.
याआधी झालेल्या घाणा आणि चुडा सोहळ्यात प्राजक्ताने गुलाबी पैठणी नेसली होती. तिचा पारंपरिक लूक सगळ्यांना आवडला.
प्राजक्ता आणि शंभूराजचं लग्न पुण्यात पार पडणार आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावरून त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
