Zee Marathi Dupar: सध्या मराठी वाहिन्यांवर नव्या मालिकांची रेलचेल सुरू आहे. वेगवेगळ्या विषयांवर आधारित कथा आणि नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र तरीही जुन्या मालिकांची मोहिनी आजही तशीच कायम आहे. अनेक प्रेक्षकांच्या मनात काही मालिका अजूनही घर करून आहेत.
याच पार्श्वभूमीवर झी मराठीने मोठी घोषणा केली आहे. वाहिनीवरील दोन गाजलेल्या मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. झी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर करत ही माहिती दिली आहे.
नव्या मालिकांबरोबरच जुन्या मालिकांची कथा आणि त्यांची शीर्षकगीतं प्रेक्षकांना आजही भावतात. हे लक्षात घेऊन झी मराठीने दुपारच्या वेळेत खास सत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘झी मराठी दुपार’ या नव्या सत्राची सुरुवात दोन लोकप्रिय मालिकांनी होणार आहे.
२२ डिसेंबरपासून दुपारच्या वेळेत ‘माझी तुझी रेशीमगाठ’ आणि ‘लागिरं झालं जी’ या मालिका पुन्हा प्रसारित केल्या जाणार आहेत. दुपारी ३ वाजता ‘माझी तुझी रेशीमगाठ’ तर ४ वाजता ‘लागिरं झालं जी’ ही मालिका पाहता येणार आहे. हे सत्र सलग दोन तास प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोवर प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून, पुन्हा एकदा या मालिका पाहण्याची उत्सुकता व्यक्त केली आहे.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत प्रार्थना बेहेरे, बालकलाकार मायरा वायकुळ आणि श्रेयस तळपदे यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. तर ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील शिवानी बावकर आणि नितीश चव्हाण यांची जोडी प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली होती.
धिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी चित्रपट, टीव्ही शो आणि ओटीटीवरील नवीन अपडेट्स, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. वेगवान, स्पष्ट आणि फॅक्ट-बेस्ड रिपोर्टिंग करणं हे माझं वैशिष्ट्य आहे.
