Tighi Movie: मराठी प्रेक्षकांसाठी एक संवेदनशील कथा लवकरच मोठ्या पडद्यावर येत आहे. सुप्री मीडिया आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा चित्रपट येत्या महिला दिनी, म्हणजे ६ मार्च २०२६ रोजी रिलीज होणार आहे. आई आणि मुलींच्या नात्यात दडलेल्या भावना, न बोललेल्या गोष्टी आणि मनात साचलेल्या आठवणी यावर आधारित हा चित्रपट आहे.
‘तिघी’मध्ये या तीन महिलांच्या जगण्यातलं चौथं पान उलगडताना त्यांचे विचार, नात्यात येणारे बदल आणि भावनिक चढ-उतार यांचा वेध घेतला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केले असून, ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर, नेहा पेंडसे बायस आणि सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
दिग्दर्शिका जीजिविषा काळे सांगतात की हा चित्रपट आई-मुलींच्या आतल्या भावविश्वाचा प्रवास मांडतो. दैनंदिन जीवनात जे अनेक भाव आपण व्यक्त करू शकत नाही, ते क्षण या कथेतून समोर येणार आहेत.
चित्रपटाचे निर्माते शार्दूल सिंह बायस म्हणाले की, आई आणि मुलीचं नातं प्रत्येक घरात विशेष असतं. प्रेम, काळजी आणि त्याग या नात्याचा गाभाच असतो, आणि ‘तिघी’ हेच वास्तव मनाला भिडेल अशा पद्धतीने दाखवणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती शार्दूल सिंह बायस, नेहा पेंडसे बायस, निखिल महाजन, सुहृद गोडबोले आणि स्वप्निल भंगाळे यांनी संयुक्तपणे केली आहे. या टीमचं पुन्हा एकत्र येणं प्रेक्षकांना एक भावस्पर्शी कलाकृतीची अपेक्षा देतंय.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही शो आणि ओटीटीवरील नवीन अपडेट्स, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. वेगवान, स्पष्ट आणि फॅक्ट-बेस्ड रिपोर्टिंग करणं हे माझं वैशिष्ट्य आहे.
