Shubhangi Sadavarte: अभिनेत्री शुभांगी सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने पहिल्या पती आनंद ओकपासून घटस्फोट जाहीर केला होता. त्यांच्या विभक्त होण्याच्या बातमीने अनेक चाहते खूप अस्वस्थ झाले होते. पण आता शुभांगीने आयुष्यात नवी वाट पकडत दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला आहे.
शुभांगीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक छोटा, सुंदर केळवणाचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओत ती आणि तिचे होणारे पती सुमीत म्हाशेळखर हसत-गप्पा मारताना दिसत आहेत. मित्रांनी केलेली मस्त सजावट, जेवणाचा मेन्यू आणि त्यांचा आनंद—सगळं अगदी नैसर्गिक दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर होताच चाहत्यांनी शुभांगी आणि सुमीतला शुभेच्छांचा वर्षाव केला.
शुभांगी आणि आनंद ओक यांचं लग्न 2020 साली कोरोनाकाळात झालं होतं. पाच वर्षांनी त्यांनी परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आनंद ओक यांनीही पोस्ट करत त्या निर्णयाबद्दल सांगितलं होतं आणि शुभांगीच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
आता, घटस्फोटाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत शुभांगीने आयुष्यातील नवा अध्याय सुरू केला आहे. तिच्या ‘संगीत देवबाभळी’मुळे तिला मोठी ओळख मिळाली असली तरी ती ‘पुन्हा कर्तव्य आहे’ आणि ‘नवे लक्ष्य’ यांसारख्या मालिकांमध्येही झळकली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
