Ruchita Jamdar Eliminated from Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीमध्ये या आठवड्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. घरातून बाहेर जाण्यासाठी सात सदस्य नॉमिनेट झाले होते. यामध्ये प्राजक्ता शुक्रे, दिपाली सय्यद, सागर कारंडे, रुचिता जामदार, संस्कृती साळुंके, प्रभू शेळके आणि तन्वी कोलते यांचा समावेश होता.
या सात सदस्यांपैकी कोणाचा प्रवास थांबणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, सोशल मीडियावर एक शॉकिंग अपडेट समोर आली आहे. त्यानुसार, रुचिता जामदार शोमधून एलिमिनेट झाल्याची चर्चा रंगली आहे.
रुचिताचा प्रवास सुरुवातीपासूनच चर्चेत होता. तिच्या गेमकडे अनेक प्रेक्षकांचं लक्ष होतं. काहींना वाटत होतं की ती सहज टॉप ५ मध्ये पोहोचेल. पण गेल्या काही आठवड्यांमध्ये ती घरात अनेकदा खचलेली दिसली. काही वेळा ती रडतानाही दिसली.
घरातील तिच्या खेळाबद्दलही चर्चा होत होती. अनेकदा ती विशालच्या प्रभावाखाली खेळतेय, अशी टीका करण्यात आली. याच गोष्टीचा परिणाम तिच्या गेमवर झाला, असंही बोललं जात आहे.
रुचिता एलिमिनेट झाल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र अद्याप Colors Marathi किंवा शोच्या टीमकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दरम्यान, आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या ‘भाऊच्या धक्क्यावर’मध्ये रितेश देशमुख कोण घराबाहेर जाणार याची घोषणा करणार आहे. त्यामुळे खरा निकाल रविवारच्या भागात स्पष्ट होणार आहे.
रुचिता जामदार घरात आल्यापासून चर्चेत होती. तिच्या गेमवर अनेक वेळा होस्टनेही भाष्य केलं होतं. घरातील काही सदस्यांशी तिचे वादही झाले होते. त्यामुळे तिचा प्रवास सतत चर्चेत राहिला.
रुचिताबद्दल बोलायचं झालं तर, ती MTV Roadiesमुळे घराघरात पोहोचली. त्यानंतर नृत्य आणि रिअलिटी शोमधून तिने स्वतःची वेगळी ओळख तयार केली. Bigg Boss Marathi 6 मध्येही तिच्या खेळामुळे ती सतत चर्चेत राहिली.
आता जर रुचिता खरोखरच बाहेर पडली असेल, तर पुढच्या आठवड्यात घरातील संपूर्ण गेमच बदलू शकतो, अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू झाली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
