Prajakta Gaikwad: ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि लाखोंच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आता लग्नाच्या तयारीत आहे. नुकताच तिचा उद्योजक शंभुराज खुटवड यांच्यासोबत ७ ऑगस्ट रोजी साखरपुडा झाला. पण या दोघांची पहिली भेट कशी झाली? हा प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करून बसला होता. आता स्वतः प्राजक्ताने या फिल्मी लव्हस्टोरीचं रहस्य उघड केलं आहे.
१८व्या वर्षीपासून येऊ लागली स्थळं
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ताने सांगितलं, “महाराणी येसूबाईंची भूमिका केल्यानंतर मी संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले. वयाच्या १८व्या वर्षीपासून वेगवेगळ्या क्षेत्रांतून स्थळं येऊ लागली. पण मी ठरवलं होतं, आधी डिग्री पूर्ण करायची आणि मगच आयुष्यात पुढचं पाऊल टाकायचं.”
अशी झाली पहिली भेट!
प्राजक्ता म्हणते, “त्या दिवशी मी एका चित्रपटाच्या नाईट शूटसाठी निघाले होते. नवीन घरासाठी देवाची मूर्ती घेण्यासाठी जात असताना अचानक एक ट्रक आमच्या गाडीला धडकला. मी चांगलीच हायपर झाले आणि ड्रायव्हरवर रागावले. त्याला ओनरला बोलवायला सांगितलं… आणि तेव्हाच शंभुराज आले! त्यांनी ड्रायव्हरची बोलणी करून घेतली आणि सगळं व्यवस्थित हाताळलं. नंतर ते मला सेटवर सोडायला आले.”
‘ताई’ नाही, फक्त ‘मॅडम’!
त्या दिवसानंतर दोघांची मैत्री घट्ट झाली. प्राजक्ता सांगते, “माझ्या भूमिकेमुळे सगळे मला ‘ताई’ म्हणायचे. पण शंभुराज मात्र कधीच तसं बोलले नाहीत, ते मुद्दाम ‘मॅडम’ म्हणायचे. मीही त्यांना ‘दादा’ म्हणायचे.”
मैत्रीचं रुपांतर प्रेमात
पहिली भेट अपघातात झाली, पण हळूहळू मैत्री प्रेमात बदलली. सुरुवातीला प्राजक्ताने नकार दिला, पण शंभुराज यांनी तिचं काम, क्षेत्र ओळखून विश्वास जिंकला. अखेर घरच्यांच्या संमतीने साखरपुडा ठरला आणि आता लग्नाची आतुरता सुरू आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
