‘नशीबवान’चा दमदार प्रोमो प्रदर्शित! ‘सुभेदार’ फेम अजय पूरकर खलनायकाच्या भूमिकेत

Nashibwan Serial: स्टार प्रवाहवरील प्रेक्षकांसाठी आणखी एक नवीन मालिका घेऊन कोठारे व्हिजन लवकरच येत आहे. ‘नशीबवान’ नावाच्या या मालिकेत ‘सुभेदार’ सिनेमातील लोकप्रिय अभिनेता अजय पूरकर क्रूर आणि कपटी खलनायक नागेश्वर घोरपडे म्हणून झळकणार आहेत.

अजय पूरकरसोबतच अभिनेत्री प्राजक्ता केळकर मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. प्राजक्ता यापूर्वी ‘मुलगी झाली हो’ मालिकेत दिसल्या होत्या. तर अभिनेत्री नेहा नाईक या मालिकेतून मुख्य नायिका म्हणून मालिकाविश्वात पदार्पण करत आहेत.

‘नशीबवान’चा नुकताच प्रदर्शित झालेला प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतोय. त्यात अजय पूरकर गोकुळाष्टमीचा पाळणा गाताना दिसतात. दुसरीकडे मालिकेची नायिका तिच्या वडिलांना दारूच्या व्यसनापासून दूर करण्याचा प्रयत्न करते. त्याचवेळी एक गुरुजी येऊन नागेश्वर घोरपडेंना सांगतात की आता तुमच्या नशिबाचे फासे उलटणार आणि ही संपत्ती खरी मालकाकडे जाणार आहे. यावर घोरपडे म्हणतात, “मी जिथे तिच्या आई-बाबांना गाडलं, तिथे पोरीचं काय? आज नाही मारणार तुम्हाला, सांगून झोपवणार…” या संवादातून त्यांची भूमिका किती खलनायकी आहे हे स्पष्ट होतं.

आता ही मालिका प्रेक्षकांना दुपारी दिसणार की रात्रीच्या प्राइम टाइमला, हे लवकरच कळेल. तसेच ‘नशीबवान’ सुरू झाल्यावर कोणती जुनी मालिका संपणार याची उत्सुकता देखील वाढली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page