मराठी सिनेसृष्टीत नेहमीच नव्या जोड्या आणि वेगळ्या विषयांचे चित्रपट पाहायला मिळतात. आता ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळे ही लोकप्रिय जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. ‘आरपार’ या रोमँटिक चित्रपटातून दोघांची जोडी प्रेक्षकांसमोर येणार असून, नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे.
टिझरमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज आणि नात्यातील ताणतणाव एकत्र दिसतो. पाहणाऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की हे प्रेमकथेचा सुखद शेवट असणार की वेगळेपणाचा. ‘प्रेमात अधलं-मधलं काही नसतं’ हे दाखवणारा हा सिनेमा प्रेमाची अनोखी परिभाषा मांडतो.
या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे तो 12 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे, आणि हाच दिवस ललित व हृता दोघांचाही वाढदिवस आहे. पहिल्यांदाच एकत्र काम करण्याची संधी मिळाल्यामुळे दोघांसाठीही हा क्षण खास आहे. चाहत्यांसाठी तर ही खरी पर्वणीच आहे.
चित्रपटाचं दिग्दर्शन, कथा, पटकथा आणि संवाद गौरव पत्की यांनी लिहिले आहेत. निर्मिती नामदेव काटकर आणि रितेश चौधरी यांची असून, ‘लिऑन्स मीडिया प्रॉडक्शन एलएलपी’ अंतर्गत हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.
‘आरपार’ हा भावनिक आणि रोमँटिक सिनेमा 12 सप्टेंबरपासून सर्वत्र प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, आणि या फ्रेश जोडीचा पहिला चित्रपट असल्यामुळे त्याची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
