Lakshmichya Paulanni Serial: ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका गेली दोन वर्षे प्रेक्षकांना भावते आहे. प्रत्येक पात्राशी प्रेक्षकांनी जवळीक निर्माण केली आहे. आता मालिकेत एक मोठा बदल घडतोय. कथेत नवीन पात्र सुकन्या पाटीलची एण्ट्री होत आहे आणि ही भूमिका अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर साकारणार आहे.
सुकन्या ही व्यवसायाने नर्स. शांत, साधं आयुष्य जगणारी पण मनात अनेक गुपितं दडवून ठेवणारी मुलगी. रुग्णांची सेवा करायला तिला आवडतं, आणि लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा तिला खूप समाधान मिळतं. नक्षत्रा जवळपास चार वर्षांनी मालिकेतून पुनरागमन करत असल्याने चाहतेही उत्सुक आहेत.
नक्षत्रा म्हणाली की मालिकांमधूनच तिच्या करिअरची सुरुवात झाली होती, त्यामुळे टीव्ही जगत तिच्यासाठी खास आहे. “सुकन्या पाटील हे पात्र मी ऐकताक्षणी मला भावलं. तिचा स्वभाव आणि माझा स्वभाव जुळतो. ती खूप सकारात्मक आहे आणि देवावर तिचा पूर्ण विश्वास आहे,” असं ती म्हणाली.
तिने पुढे सांगितलं की सुकन्या बाहेरून हसतमुख असली तरी तिच्या मनात खोल जखमा आहेत. भूतकाळ ती कुणालाही सांगत नाही. “तिच्या मते मी कोण आहे यापेक्षा आज मी काय करते हे महत्त्वाचं आहे. तिच्या येण्याने कथेत नक्की काय बदल होणार, हे पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत,” असं नक्षत्राने सांगितलं.
ही मालिका रात्री 10.30 वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होते. मालिकेत इशा केसकर, अक्षर कोठारी, किशोरी आंबीये, दिपाली पानसरे, अपूर्वा सपकाळ, रोहिणी नाईक, ध्रुव दातार आणि ऋत्विक तळवलकर यांच्या भूमिका आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही शो आणि ओटीटीवरील नवीन अपडेट्स, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. वेगवान, स्पष्ट आणि फॅक्ट-बेस्ड रिपोर्टिंग करणं हे माझं वैशिष्ट्य आहे.
