बॉलीवूडच्या स्पर्धेतही मराठी सिनेमाचा विजय; ‘क्रांतीज्योती विद्यालय’ची दमदार एंट्री

Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam Collection Review: नवीन वर्षाची सुरुवात मराठी सिनेमासाठी खास ठरली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या चित्रपटानं प्रदर्शित होताच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. गेल्या काही दिवसांपासून सिनेमाची चर्चा होतीच, पण पहिल्याच दिवशी मिळालेला प्रतिसाद अपेक्षेपेक्षा जास्त आहे.

मराठी शाळांच्या प्रश्नांवर भाष्य करणारा हा सिनेमा भावनिक असल्यामुळे अनेक प्रेक्षकांशी थेट जोडला गेला. सुट्टीचा दिवस आणि सकारात्मक वर्ड ऑफ माउथ याचा फायदा चित्रपटाला मिळाल्याचं दिसून आलं.

काही रिपोर्ट्सनुसार, या सिनेमानं पहिल्या दिवशी राज्यभरात सुमारे ७८.४३ लाखांची कमाई केली आहे. मुंबई, पुणे आणि कोल्हापूरमधील अनेक मल्टिप्लेक्समध्ये शो हाऊसफुल गेले. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मिळालेला हा प्रतिसाद निर्मात्यांसाठी दिलासादायक ठरतोय.

आता येत्या वीकेंडमध्ये सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याच्या वेगानं पाहता हा चित्रपट लवकरच १ कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

बॉलिवूडचे मोठे चित्रपट आणि ‘इक्कीस’सारख्या नव्या रिलीजसोबत स्पर्धा असतानाही या मराठी सिनेमानं स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. बॉक्स ऑफिसवर समाधानकारक सुरुवात हेच त्याचं मोठं यश मानलं जात आहे.

चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचं झालं, तर रायगड जिल्ह्यातील १०० वर्षे जुनारी मराठी शाळा वाचवण्यासाठी एकत्र येणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा हा प्रवास आहे. शाळेच्या आठवणी, मैत्री आणि जबाबदारी यांची गोष्ट प्रेक्षकांना भावते.

सचिन खेडेकर, अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या भूमिका लक्षात राहणाऱ्या आहेत. याशिवाय प्राजक्ता कोळी हिनं या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही सिनेमाचं कौतुक होत असून सोशल मीडियावर ‘मस्ट वॉच’ अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page