Jui Gadkari: मराठी मालिकांमधून आपला ठसा उमटवणारी जुई गडकरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनय, नृत्य आणि गायनानंतर आता ती एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. जुई लवकरच लेखिका म्हणून पदार्पण करणार आहे.
कॉकटेल स्टुडिओच्या माध्यमातून येणाऱ्या अनसॉल्व या वेब सिरीजचे लेखन करण्याची जबाबदारी तिने स्वीकारली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर तिने इंस्टाग्राम स्टोरीतून ही बातमी शेअर केली. क्लॅपचा फोटो टाकत “लवकरच लेखिका म्हणून सुरुवात” असे तिने लिहिले.
जुईने यापूर्वी पुढचं पाऊल, सरस्वती, वर्तुळ आणि सध्या सुरू असलेल्या ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचा सहभाग बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये आणि सिंगिंग स्टार या रिअॅलिटी शोमध्येही लक्षवेधी ठरला होता.
आता ती लेखन क्षेत्रात उतरली असली, तरी ‘ठरलं तर मग’ ही मालिका सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचे जुईने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एकाच वेळी तिच्या दोन वेगळ्या बाजू पाहायला मिळणार आहेत. चाहत्यांसाठी ही बातमी नक्कीच आनंदाची आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
