जग्गू आणि ज्युलिएटला राज्य पुरस्कारात मोठा सन्मान – अमेय वाघ, महेश लिमये यांच्यासह टीमला मिळाले अनेक पुरस्कार

६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव २०२५ मध्ये ‘पुनीत बालन स्टुडिओज’ निर्मित जग्गू आणि ज्युलिएट या चित्रपटाने आपली जोरदार छाप पाडत द्वितीय क्रमांकाचा उत्कृष्ट चित्रपट हा मानाचा किताब पटकावला.

या सोहळ्यात फक्त चित्रपटालाच नव्हे, तर त्यातील कलाकार आणि तांत्रिक टीमलाही विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.

पुनीत बालन स्टुडिओजचा दर्जेदार प्रवास

‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांनी ‘मुळशी पॅटर्न’, ‘रानटी’ आणि जग्गू आणि ज्युलिएटसारखे अनेक दर्जेदार मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले आहेत. तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या जग्गू आणि ज्युलिएटचं चित्रीकरण उत्तराखंडच्या निसर्गरम्य ठिकाणी करण्यात आलं होतं.

अमेय वाघ (जग्गू) आणि वैदही परशुरामी (ज्युलिएट) यांच्या फुलणाऱ्या प्रेमकथेनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

पुरस्कार सोहळ्यातील मानाचा क्षण

मुंबईत आयोजित या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते २०२४ व २०२५ मधील उत्कृष्ट चित्रपट आणि कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

जग्गू आणि ज्युलिएटला मिळालेले पुरस्कार:

  • उत्कृष्ट अभिनेता (प्रथम) – अमेय वाघ
  • उत्कृष्ट दिग्दर्शक (द्वितीय क्रमांक) – महेश लिमये
  • उत्कृष्ट विनोदी अभिनेता – उपेंद्र लिमये
  • उत्कृष्ट वेशभूषा – मानसी अत्तरदे
  • उत्कृष्ट लेखक – अंबर हडप आणि गणेश पंडित
  • उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक – राहुल-संजीर

पुनीत बालन यांची प्रतिक्रिया

पुरस्काराबद्दल बोलताना पुनीत बालन म्हणाले,

जग्गू आणि ज्युलिएटला द्वितीय क्रमांकाचा उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळणं हा संपूर्ण टीमसाठी अभिमानाचा क्षण आहे. दिग्दर्शक, कलाकार आणि तांत्रिक सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. आमच्या सर्व चित्रपटांना मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रेमाबद्दल मी आभारी आहे आणि पुढेही अशाच दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करण्याचा प्रयत्न करत राहीन.”

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page