Govinda: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा याची तब्येत अचानक बिघडली होती. रात्री उशिरा तो घरी बेशुद्ध पडल्याने त्याला मुंबईतील जुहू येथील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले आणि आज दुपारी त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
अभिनेत्याचे वकील ललित बिंदल यांनी सांगितलं की, गोविंदाला चक्कर आली आणि तो काही वेळ शुद्धीवर नव्हता. उपचारानंतर त्याची तब्येत सुधारली असून काही टेस्ट अजून सुरू आहेत. चाहत्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.
डिस्चार्जनंतर टाइम्स ऑफ इंडियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गोविंदाने स्वतः आरोग्य अपडेट दिलं. तो म्हणाला, “खूप खूप धन्यवाद, मी ठीक आहे. मी नियमित योगा आणि प्राणायाम करतो. व्यायाम माझ्या आयुष्याचा भाग आहे. माझी पर्सनॅलिटी उत्तम राहावी यासाठी मी प्रयत्न करतोय.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेता आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र सुनीताने स्पष्ट सांगितलं, “जेव्हा मी स्वतः त्याला रंगेहात पकडेन तेव्हा सगळं खरं सांगेन,” त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना आळा बसला.
गोविंदा गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे, पण त्याच्या चाहत्यांमध्ये त्याची लोकप्रियता अजूनही तशीच आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत ‘राजा बाबू’, ‘कुली नंबर 1’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘दीवाना मस्ताना’, ‘दुल्हा राजा’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
