Dombivlikar Cup: डोंबिवली जिमखाना मैदानावर यंदा क्रिकेट आणि सेलिब्रिटींच्या ग्लॅमरचा खास संगम पाहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रातील सुमारे 80 कलाकार एकाच मैदानावर उतरून ‘डोंबिवलीकर चषका’साठी जोरदार स्पर्धा करणार आहेत. 6 आणि 7 डिसेंबर 2025 या दोन दिवसांत ही रोमांचक सेलिब्रिटी क्रिकेट लीग रंगणार आहे.
मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग (MCCL) अंतर्गत या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवलीकर संस्थेचा हा उपक्रम असून संपादक, आमदार रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून यावर्षी हा मोठा कार्यक्रम उभा राहिला आहे.
यंदाच्या चषकाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील 8 ज्येष्ठ दिग्गजांच्या नावाने संघांची निर्मिती करण्यात आली आहे. निळू फुले संघाचा कॅप्टन सिद्धार्थ जाधव आहे. या संघात शिव ठाकरे, नुपूर दुधवाडकर, वरद चव्हाण यांसह अनेक कलाकार आहेत. दुसऱ्या भालजी पेंढारकर संघाचे नेतृत्व हार्दिक जोशी करणार असून त्याच्या टीममध्ये सौरभ चौगुले, धनश्री काडगांवकर आदींचा समावेश आहे.
दादासाहेब फाळके संघाचे कॅप्टन संजय जाधव आहेत, तर रंजना संघाचं नेतृत्व तितिक्षा तावडे करणार आहे. त्याचबरोबर पु. ल. देशपांडे संघाचा कॅप्टन प्रवीण तरडे असेल. दादा कोंडके संघाची धुरा प्रथमेश परबकडे असेल. तर व्ही. शांताराम संघाचे नेतृत्व विजू माने करणार आहेत. शेवटचा भक्ती बर्वे संघ अनुजा साठे सांभाळणार आहे.
मैदानावर कलाकारांची फिल्डिंग, बॅटिंग, चौकार-षटकारांचा वर्षाव आणि मैत्रीपूर्ण टक्कर यामुळे प्रेक्षकांसाठी हा खऱ्या अर्थाने मनोरंजनाचा उत्सव ठरणार आहे. डोंबिवलीत दोन दिवस संपूर्ण वातावरण उत्साहाने रंगून जाणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
