“दशावतार”चं पहिलं गाणं ‘आवशीचो घो’ रिलीज; बाप-मुलाच्या नात्यातला मजेशीर आणि हळवा प्रवास

‘दशावतार’ हा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट १२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओज, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे यांसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत.

पोस्टर आणि टीझरनंतर आता या चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवशीचो घो’ प्रदर्शित झालं आहे. कोकणच्या मातीचा सुगंध घेऊन आलेलं हे गाणं बाप आणि मुलाच्या अनोख्या नात्याची कथा सांगतं. मालवणी भाषेत ‘आवशी’ म्हणजे आई आणि ‘घो’ म्हणजे नवरा. त्यामुळे आईच्या नवऱ्याला म्हणजेच वडिलांना प्रेमाने ‘आवशीचो घो’ म्हणतात. या गाण्यातून त्या नात्यातील प्रेम, मिश्कीलपणा आणि आपुलकी सुंदररीत्या मांडली आहे.

दिलीप प्रभावळकर आणि सिद्धार्थ मेनन यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं वरवर गंमतीशीर वाटत असलं तरी त्यात भावनिक गाठ आहे. कधी मुलगा वडिलांची जबाबदारी घेतो, तर कधी वडील मुलासारखे होतात—हे नात्याचं सौंदर्य या गाण्यात दिसतं. गीत गुरु ठाकूर यांनी लिहिलं आहे, संगीत ए व्ही प्रफुल्लचंद्र यांचं असून, ओंकार स्वरूप यांनी ते गायलं आहे.

गुरु ठाकूर यांच्या मते, बाप आणि मुलाच्या मैत्रीपूर्ण नात्याला अशा खट्याळ अंदाजात सादर करणारे गाणं याआधी झालं नव्हतं. मालवणी शब्दांचा गोडवा, संगीताची जादू आणि दिलीपजी व सिद्धार्थ यांचा पडद्यावरील परफॉर्मन्स यांनी हे गाणं खास बनवलं आहे.

लेखक-दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांच्या मते, ‘आवशीचो घो’ वडील-मुलाच्या नात्यातील प्रेम, ताण, समज-गैरसमज आणि बदलणाऱ्या जबाबदाऱ्या एका गाण्यात सहजपणे दाखवतं. हे गाणं पाहताना प्रेक्षकांना स्वतःच्या वडिलांची आठवण होईल, आणि हसताहसता मनालाही भिडेल.

‘दशावतार’चा टीझर आधीच प्रेक्षकांना भुरळ घालतोय, आणि आता या गाण्याने चित्रपटातील भावनिक बाजूही उघड झाली आहे. हसवणारं आणि हळवं असं हे गाणं प्रेक्षकांच्या मनात नक्की घर करून राहील.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page