बिग बॉस मराठीमध्ये रितेशचा तुफान क्लास, विशाल-ओमकारवर भडकले

Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka: कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन 6 सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सीझनचा पहिला भाऊचा धक्का प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. या भागात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

आजच्या भाऊचा धक्क्यावर रितेश काही स्पर्धकांचे कौतुक करणार आहे, तर काहींची चांगलीच शाळा घेणार आहे. या आठवड्यात अभिनेता विशाल कोटियन आणि ओमकार यांचं वागणं घरात चर्चेचा विषय ठरलं होतं.

ओमकारने विशालची एक वस्तू फेकल्यामुळे घरात मोठा गोंधळ झाला होता. यावर रितेशने दोघांनाही स्पष्ट शब्दांत सुनावलं. रितेश म्हणाला की, राग येणं आणि भावनिक जोड असणं स्वाभाविक आहे. पण इतरांना त्या गोष्टीची किंमत कळेलच असं नाही. शोमध्ये एकमेकांची इतकी अवहेलना करणं थांबवलं पाहिजे, असंही त्याने सांगितलं.

यानंतर रितेशने दोघांनाही थेट इशारा दिला. तो म्हणाला, हा शो आता फक्त युवकांचा राहिलेला नाही. संपूर्ण कुटुंब एकत्र बसून हा शो पाहतो. त्यामुळे तुम्ही दाखवणारे वर्तन महत्त्वाचं आहे. मारामारी, धक्काबुक्की, ताकदीचा माज हे इथे चालणार नाही.

रितेशने स्पष्ट शब्दांत सांगितलं, “हे घर आहे, रस्त्याचा नाका नाही. इथे दादागिरी नाही, फक्त भाऊगिरी चालणार.” या शब्दांत त्याने विशाल आणि ओमकारची खरडपट्टी काढली.

आता या खडेबोलांनंतर स्पर्धक आपलं वागणं सुधारतील की घरात आणखी गोंधळ होईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बिग बॉस मराठी भाऊचा धक्का रोज रात्री ८ वाजता फक्त कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळेल.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page