Bigg Boss Marathi 6: Sonali Raut Eliminated: ‘बिग बॉस मराठी ६’च्या आजच्या भागात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. सुरुवातीला रितेशने प्रभूला सुनावलं. त्याचबरोबर विशाललाही त्याने धारेवर धरलं. टास्कदरम्यान रितेश आणि सागरमध्ये वाद झाला. “तुम्ही सोयीनुसार आवाज चढवता,” असं रितेश सागरला म्हणाला. प्रभूला डिवचल्याबद्दल इतर स्पर्धकांनाही त्याने सुनावलं.
रितेशने नॉमिनेटेड आठ स्पर्धकांना समोर बसायला सांगितलं. त्यापैकी प्रभू आणि दीपाली सेफ असल्याचं जाहीर केलं. दोघांनाही खूप आनंद झाला. राकेशने दीपालीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
यानंतर मुलं विरुद्ध मुली असा टास्क झाला. ईमोजी पाहून गाणी ओळखायची होती. रितेशने प्रभूची मजा घेतली. प्रभू प्रत्येक टास्कमध्ये नाचताना दिसला. या टास्कमध्ये मुलींची टीम जिंकली.
पुढे कलाकार कट्ट्यावर आयुष आला. त्याने हृतिक रोशनची नक्कल केली आणि विशालचीही खिल्ली उडवली. संपूर्ण घरात हशा पिकला. सागर कारंडेने रामदास आठवले यांची मिमिक्री केली.
यानंतर बुद्धिबळाचा टास्क झाला. अनुश्रीने स्वतःला उंट, सागरला राजा आणि विशालला वजीर म्हटलं. इतर स्पर्धकांनाही तिने वेगवेगळ्या सोंगट्यांची भूमिका दिली. करणनेही स्वतःच्या मते स्पर्धकांची निवड केली.
चुलीत घालण्याच्या टास्कमध्ये अनेकांनी नावडत्या स्पर्धकांचे फोटो फाडून चुलीत टाकले. राकेशने अनुश्रीला, तन्वीने सोनालीला, विशालने राकेशला आणि प्रभूने सागरला चुलीत टाकलं. प्राजक्ता आणि रुचिता यांनीही आपापले फोटो टाकले.
यानंतर सुरू झाला एलिमिनेशन प्रोसेस. डेंजर झोनमध्ये सहा स्पर्धक होते. टास्कनंतर रुचिता, विशाल, करण आणि प्राजक्ता सेफ झाले. शेवटी सोनाली राऊत आणि ओमकार राऊत यांच्यात सामना झाला. यातून ओमकार सेफ झाला आणि सोनाली राऊत एलिमिनेट झाली.
दुसऱ्या आठवड्यातच घराबाहेर पडलेल्या सोनालीचा प्रवास इथेच संपला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
