Bigg Boss Marathi 6: कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी 6 ची सुरुवात होताच घरात वातावरण तापलेलं दिसत आहे. पहिल्याच दिवशी दोन स्पर्धकांमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलं. या आहेत रुचिता जामदार आणि तन्वी कोलते. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दोघींमध्ये जोरदार वाद पाहायला मिळतो.
‘लक्ष्मीनिवास’ मालिकेमुळे तन्वी कोलते आधीपासूनच प्रेक्षकांना परिचित आहे. मात्र रुचिता जामदार ही नेमकी कोण, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे तिच्या आधीच्या प्रवासाबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
रुचिता मूळची कोल्हापूरची आहे. लहानपणापासूनच तिने नृत्य आणि शस्त्रविद्येचं प्रशिक्षण घेतलं. ग्लॅमरच्या दुनियेत करिअर घडवण्यासाठी ती मुंबईत आली. तिला पहिली मोठी ओळख मिळाली ती ‘रोडीज’ या रिअॅलिटी शोमधून.
रोडीजमध्ये असताना तिचा सडेतोड आणि फटकळ स्वभाव प्रेक्षकांच्या लक्षात आला. याच काळातील तिचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रुचिता परीक्षकांसमोरच एका स्पर्धकाशी वाद घालताना दिसते. तेव्हा अनेकांनी तिला ‘निक्की तांबोळी 2’ असं म्हणायला सुरुवात केली होती.
आता बिग बॉस मराठी सीजन 6 च्या घरातही रुचिता असाच आक्रमक खेळ खेळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. येत्या दिवसांत तिचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर येणार आहे. बिग बॉस मराठी 6 दररोज रात्री 8 वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
