Bigg Boss Marathi 6: प्रभू शेळके एलिमिनेट; घरात भावनिक वातावरण

Bigg Boss Marathi 6 मध्ये आता खेळ अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. घरात सध्या डबल एलिमिनेशन सुरू असून या आठवड्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला.

‘भाऊच्या धक्क्यावर’ नुकताच एक धक्कादायक निर्णय झाला. प्रभू शेळके याला घराचा निरोप घ्यावा लागला. टॉप 10 मध्ये पोहोचूनही शेवटच्या टप्प्यात त्याची स्वप्नं अपूर्ण राहिली.

या आठवड्यात एकूण सात सदस्य नॉमिनेट होते. त्यात दिपाली सय्यद, प्रभू शेळके, राकेश बापट, रेवा कौरासे, अनुश्री माने, सागर कारंडे आणि संकेत पाठक यांचा समावेश होता. शेवटी डेंजर झोनमध्ये प्रभू आणि रेवा कौरासे उरले. त्यातून प्रभू एलिमिनेट झाला.

प्रभूच्या जाण्याने घरात भावनिक वातावरण निर्माण झालं. विशेषतः तन्वीला त्याचा खूप धक्का बसला. इतर सदस्यही यावेळी भावुक झाले.

घरातून बाहेर पडल्यावर प्रभूने प्रेक्षकांचे आभार मानले. तो म्हणाला की, “महाराष्ट्राने खूप प्रेम दिलं. माझं स्वप्न ट्रॉफी जिंकण्याचं होतं, पण ते पूर्ण झालं नाही. तरीही मी इथे येऊन माझ्या कुटुंबाचं एक स्वप्न पूर्ण केलं, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.”

प्रभू शेळके हा जालना जिल्ह्यातील एका छोट्या गावातून आलेला आहे. सोशल मीडियावर तो ‘काळू डॉन’ म्हणून ओळखला जातो. त्याच्या कॉमेडी व्हिडिओंमुळे तो लोकप्रिय झाला.

शोमध्ये त्याने स्वतःच्या आयुष्याबद्दलही सांगितलं होतं. त्याला गेल्या काही वर्षांपासून थॅलेसेमिया हा आजार आहे. या आजारामुळे त्याला दर महिन्याला रक्त बदलावे लागते. या उपचारांसाठी त्याच्या कुटुंबाने खूप संघर्ष केला आहे. तरीही प्रभूने कधीही शॉर्टकट न निवडता मेहनतीवर भर दिला.

आता प्रभूच्या एलिमिनेशननंतर पुढचा नंबर कोणाचा लागणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सोशल मीडियावर संकेत पाठकच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लवकरच ‘भाऊच्या धक्क्यावर’ पुढचा निर्णय जाहीर होणार आहे. हा शो Colors Marathi वर आणि JioHotstar वर दररोज रात्री 8 वाजता पाहायला मिळतो.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page