Riteish Deshmukh: बिग बॉस मराठीचा सहावा सीझन आता फार दूर नाही. काही दिवसांपूर्वी कलर्स मराठीने यंदाच्या पर्वाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करत प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली. यानंतर नेटकऱ्यांमध्ये यंदा कोणते स्पर्धक असतील आणि सीझन कोण होस्ट करणार यावर मोठी चर्चा सुरू होती.
आज कलर्स मराठीनं आणखी एक पोस्ट शेअर करत उत्सुकतेला अधिक हवा दिली. पोस्टरमध्ये सलमान खान समोर उभा दिसतो आणि त्याच्या मागे एका व्यक्तीची सावली दिसते. कॅप्शनमध्ये लिहिलंय – “बिग बॉस मराठी फॅन्स, ही लय भारी खबर ओळखलीत का?” त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली.
सोशल मीडियावर अनेकांनी अंदाज व्यक्त केला की ती सावली रितेश देशमुख यांची आहे. हिंदी बिग बॉसच्या सेटच्या बाहेर रितेशचा व्हिडिओ देखील अलिकडे व्हायरल झाला होता. काही दिवसांपूर्वी रितेशने सलमान खानच्या शोला भेट दिली होती, त्यामुळे या चर्चेला आणखी जोर मिळाला आहे.
कलर्स मराठीच्या पोस्टमध्ये “लय भारी खबर कधी आणि कुठे?” असा उल्लेख आहे आणि त्यासाठी हिंदी बिग बॉस पाहा, अशी सूचना दिली आहे. त्यामुळे याच भागात होस्टचं नाव जाहीर होण्याची शक्यता नेटकरी व्यक्त करत आहेत.
आता खरोखरच बिग बॉस मराठी 6 साठी रितेश देशमुख होस्ट म्हणून दिसणार का, हे लवकरच स्पष्ट होईल. तोपर्यंत चाहत्यांच्या उत्सुकतेचा ताप वाढतच आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
