फक्त कमाई नाही, तर महाराष्ट्रात १ लाख २५ हजारांहून अधिक तिकिटांची विक्रीही झाली आहे. प्रेक्षकांचा हा वाढता प्रतिसाद पाहून चित्रपटाच्या शोमध्ये वाढ करण्यात आली आहे.
सध्या पाच मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर स्पर्धेत असतानाही ‘आदि अनंत’ने दुसऱ्या आठवड्यातही दिमाखात कामगिरी केली आहे. महाराष्ट्रातील सुमारे २०० चित्रपटगृहांमध्ये २५० हून अधिक शोसह चित्रपटाची घोडदौड सुरू आहे.
चित्रपटाची खरी वैशिष्ट्य म्हणजे त्यातील आजोबा-नातवाच्या नात्याची भावनिक कहाणी. दोघांमधील मतभेद, संवाद, प्रेम आणि एकमेकांबद्दलची ओढ अशा हृदयस्पर्शी पद्धतीने मांडली आहे की प्रेक्षकांना ती आपली वाटते.
अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांची नैसर्गिक अभिनयशैली आणि दोघांमधील सुंदर केमिस्ट्री यामुळे भावनिक प्रसंगांची मांडणी प्रेक्षकांना विशेष भावते. केवळ मनोरंजन नाही, तर नात्यांकडे नव्याने पाहण्याची जाणीवही हा चित्रपट देतो.
चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल दिग्दर्शक महेश लिमये म्हणाले, “प्रेक्षकांनी ‘आदि अनंत’ला दिलेला प्रतिसाद मनापासून आनंद देणारा आहे. नात्यांमधील भावविश्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंय आणि ते चित्रपटाशी जोडले जात आहेत, हीच आमच्यासाठी मोठी पावती आहे.”
निर्माते समीर हंपी यांनीही पहिल्या आठवड्यातील यशाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “पहिल्या आठवड्यात मिळालेलं हे यश आमच्यासाठी खूप उत्साहवर्धक आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे चित्रपटाची घोडदौड सुरू असून दुसऱ्या आठवड्यातही २०० चित्रपटगृहांत आणि २५० हून अधिक शोसह चित्रपट प्रदर्शित होत आहे, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. प्रेक्षकांचे हे प्रेम असेच कायम राहील, अशी आशा आहे.”
निर्माते मुरलीधर छतवानी म्हणाले, “मराठी चित्रपटांना प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम आणि पाठिंबा नेहमीच प्रोत्साहन देणारा असतो. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी दिलेला भरभरून प्रतिसाद पाहून समाधान वाटते. पहिल्या आठवड्यातील यश आणि दुसऱ्या आठवड्यातही मिळणारा प्रतिसाद पाहता चित्रपटाची ही यशस्वी घोडदौड अशीच सुरू राहील, असा विश्वास आहे.”
पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे यांनी केली आहे. रविंद्र औटी आणि दर्शन शाह सहनिर्माते आहेत.
दिग्दर्शन महेश लिमये यांचे असून कथा, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडे यांचे आहेत.
पहिल्या आठवड्यातील दमदार कमाईनंतर दुसऱ्या आठवड्यातही ‘आदि अनंत’ची ही घोडदौड कायम राहणार का, याकडे मराठी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
