‘हास्यजत्रा’च्या पडद्यामागचा महत्त्वाचा चेहरा हरपला; विजय कुमार राख यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Writer Vijay Kumar Rakh Dies: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या टीमवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कार्यक्रमाच्या सृजन टीममधील लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती लेखक-दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली.

सचिन गोस्वामी यांनी विजय कुमार राख यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. विजय कुमार हे विनोदाची उत्तम जाण असलेले आणि ग्रामीण जीवनातील बारकावे टिपणारे मराठवाड्यातील होतकरू लेखक होते, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

विजय कुमार यांच्या निधनामुळे कलाक्षेत्रासह ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम आणि त्यांच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण हास्यजत्रा टीम सहभागी असल्याचेही सचिन गोस्वामी यांनी म्हटले आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या पडद्यामागे लेखक, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांची मोठी टीम काम करते. विजय कुमार राख हे याच सृजन टीमचा भाग होते. ग्रामीण जीवन, बोलीभाषा आणि रोजच्या आयुष्यातील प्रसंग विनोदी पद्धतीने मांडण्यात त्यांचा हातखंडा होता.

विजय कुमार यांच्या निधनानंतर कार्यक्रमातील कलाकारांनीही सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली. अभिनेता अंकुर वाढवे यांनी त्यांचा फोटो शेअर करत दुःख व्यक्त केले. विजय कुमार हे सर्जनशील लेखक, दिग्दर्शक आणि आपले मार्गदर्शक होते, असे त्यांनी म्हटले. त्यांच्या अकाली निधनाने आपण सुन्न झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, पृथ्वीक प्रताप, निखिल बने आणि ओंकार राऊत यांच्यासह अनेक कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. मात्र, त्यांच्या अभिनयामागे लेखक आणि सृजन टीमची मोठी मेहनत असते.

विजय कुमार राख यांच्या निधनामुळे ‘हास्यजत्रा’ची सृजन टीम आणि मराठी मनोरंजन विश्वाने एक प्रतिभावान लेखक गमावला आहे. त्यांच्या निधनाने कलाकार आणि चाहत्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page