चित्रपट रिलीज होताच त्याच्या OTT रिलीजबाबतही चर्चा सुरू झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘भूत बंगला’चे OTT राइट्स Netflix ने घेतले आहेत. त्यामुळे थिएटरनंतर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
साधारणपणे हिंदी चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर 45 ते 60 दिवसांनी OTT वर येतात. त्यानुसार ‘भूत बंगला’ जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या सुरुवातीला ऑनलाइन रिलीज होऊ शकतो. मात्र, याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.
दरम्यान, बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने चांगली सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने जवळपास 15.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरात एकूण कलेक्शन सुमारे 23.90 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे.
या चित्रपटाची कथा अर्जुन नावाच्या पात्राभोवती फिरते. तो मंगळपूरमधील एका भुताटकी वाड्यात आपल्या बहिणीचं लग्न करण्याचा प्रयत्न करत असतो. या दरम्यान 1000 वर्ष जुन्या शापाचा शोध, ‘वधूसुर’ नावाचं भूत आणि अनेक अलौकिक घटना घडताना दाखवल्या आहेत.
चित्रपटात अक्षय कुमारसोबत असरानी, राजपाल यादव, जिशू सेनगुप्ता, तब्बू, परेश रावल आणि वामिका गब्बी यांची प्रमुख भूमिका आहे. प्रेक्षकांना हा हॉरर आणि कॉमेडीचा संगम आवडताना दिसत आहे.
आता सगळ्यांची नजर OTT रिलीजवर आहे. अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतर चित्रपट घरबसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
