लाखो मुलींचा क्रश भूषण प्रधान लग्नबंधनात; पण वधू कोण हे अजूनही रहस्य

Bhushan Pradhan: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता Bhushan Pradhan सध्या त्याच्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

भूषणने नुकताच एक फोटो शेअर करत चाहत्यांना सरप्राईज दिलं. या फोटोमध्ये तो आपल्या होणाऱ्या पत्नीबरोबर दिसतोय. दोघेही अंगठी दाखवत असल्यामुळे त्यांचा साखरपुडा पार पडल्याचं स्पष्ट होतं.

महत्त्वाचं म्हणजे, या फोटोमध्ये त्याच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा दिसत नाही. त्यामुळे ती नेमकी कोण आहे, याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. लाखो तरुणींचा क्रश असलेल्या भूषणची होणारी बायको कोण, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

फोटोसोबत भूषणने लग्नाची तारीखही जाहीर केली आहे. येत्या 24 जुलै 2026 रोजी तो लग्नबंधनात अडकणार आहे. “आमच्या नव्या सुरुवातीचे साक्षीदार व्हा…” असं कॅप्शन देत त्याने ही माहिती दिली. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

भूषण याआधीही त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. विशेषतः Anusha Dandekar हिच्यासोबत त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता तो आयुष्यात पुढे जात नवं पर्व सुरू करत आहे.

कामाबद्दल बोलायचं झालं तर, भूषणने अनेक मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘घरात गणपती’, ‘लग्न कळ्ळोळ’, ‘जुनं फर्निचर’, ‘ऊन सावली’, ‘तू तिथे असावे’, ‘आम्ही दोघी’ आणि ‘कॉफी आणि बरंच काही…’ या चित्रपटांमधून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

सध्या त्याच्या लग्नाची बातमी आणि होणाऱ्या पत्नीबद्दलचं गूढ यामुळे चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. आता पुढील पोस्टमध्ये तो वधूचा चेहरा दाखवणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page